करोनाची भीती आहे की नाही?; रविवार कारंजावर अलोट गर्दी, दुकानांसमोर वाहनांच्या रांगा

करोनाची भीती आहे की नाही?; रविवार कारंजावर अलोट गर्दी, दुकानांसमोर वाहनांच्या रांगा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात दररोज सकाळी रविवार कारंजा परिसरात किराणा माल खरेदीसाठी मोठ्या संख्येने नाशिककर गर्दी करताना दिसून येत आहेत. करोनामुळे एकीकडे लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र, नाशिकच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नाशिककर मोठ्या संख्येने याठिकाणी अनावश्यक गर्दी करताना दिसतात...

विशेष म्हणजे, याठिकाणी दुकानातून माल खरेदी करताना दुचाकी, चारचाकी सर्रासपणे वेड्या वाकड्या पार्क करून ग्राहक खरेदीला जातात. परिणामी वाहतूक कोंडी होते त्यामुळे लांबच लांब रांगा याठिकाणी लागतात.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आमचे प्रतिनिधी सतीश देवगिरे यांनी या परीसरातील काही छायाचित्रे काढली. या छायाचित्रांकडे बघताना नाशिककरांना करोनाची कुठलीही भीती राहिलेली दिसत नाही असेच एकूण दिसून येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com