नाशिकरोड | दर्शन मिस्तरी

लोकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची नामुष्की ओढवली आहे....

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन होते की काय, असा प्रश्न परप्रांतीय कामगार तसेच रहिवाशांना सतावत आहे. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या चौकशीसाठी गर्दी वाढत असून, आरक्षणासाठी रांगा लागल्या आहेत.

नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गेल्या पंधरा दिवसांपासून करार संपलेला असल्याने रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या चाचण्या बंद आहेत. यामुळे रेल्वेस्थानकावर लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच परराज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तापमान तपासणी व संशयित रुग्णांच्या तपासण्या होत नाही आहेत. यामुळे नाशिक शहरात देखील कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या परिस्थितीतून लवकरात लवकर मार्ग काढायला हवा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.