जगण्याचे नवे तंत्र : अशी घ्या डोळ्यांची काळजी

जगण्याचे नवे तंत्र : अशी घ्या डोळ्यांची काळजी

करोनाच्या काळात अनेकांना संगणक, सेलफोन्सच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. स्क्रिनवर लक्ष केंद्रित करुन केल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणे, डोळे लाल होणे, टोचण्यासारखे वाटणे, खाजणे, मान किंवा डोके दुखणे असे लक्षणे दिसतात.

त्याला ‘कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम’ असे म्हटले जाते. अशा वेळी स्नायूंना विश्रांती देण्यासाठी ‘20-20-20 रुल’ म्हणजे एक तास स्क्रिनवर काम केल्यानंतर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे बघावे यामुळे कमी होतो.

स्क्रिन मिररिंग प्रकारात संगणक, मोबाईलला टीव्ही स्क्रिनवर घ्यावे आणि कामे करावीत यामुळे डोळे आणि स्क्रिनमधील अंतर वाढते. त्यामुळे डोळ्यांना फायदा होतो. वातानुकूलित यंत्रांमधून निघणार्‍या थंड हवेचा झोत थेट डोळ्यांवर पडल्यास डोळे कोरडे पडतात. एसीच्या झोतकक्षेतून डोळ्यांना दूर ठेवावे.

डोळ्यांची ठाराविक कालवधीनंतर उघडझाप करावी. संगणक अथवा मोबाईल स्क्रिनवर पाहताना पद्धत चुकल्यास जसे किमान वाकडे करणे, पाठीला पोक काढून बसणे, यामुळे मानेवर ताण येऊन डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. पाठीचा कणा ताठ ठेऊन व्यवस्थित बसल्यास हे टाळता येते. ही काळजी करोना काळासह नेहमीच घ्यावी. आणि डोळ्यांचे आरोग्य अबाधित ठेवावे कारण डोळे अनमोल आहेत.

डॉ. मनिष बापये

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com