नाशिक | मुकेश चोथाणी

आपल्या भावना (लोभ आणि भीती) आपल्या गुंतवणुकीवर यशस्वी अथवा अयशस्वीतेची छाप टाकतात.आपल्या भावनाच आपल्याला लोभी अथवा भीती दाखवतात. फाजील आत्मविश्वास आपल्या गुंतवणुकीवर नफा-नुकसान यांची मात्रा नक्की करतो.

गुंतवणुकीचे मानसशास्त्र याविषयी प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. आपण आपल्या गुंतवणुकीवर चांगले उत्पन्न भांडवलवाढ घेण्यासाठी वेळोवेळी सल्लागाराचा सल्ला आणि त्यानुसार गुंतवणुकीची फेररचना आवश्यक आहे.

करोनानंतर मार्चमध्ये आलेल्या प्रचंड मंदीनंतर भारतीय शेअर बाजारात पुनश्च तेजीचा बैल उधळला आहे. गेल्या 9 महिन्यात सेन्सेक्स 22 हजारांनी वाढून 46 हजारांच्या पलीकडे दिसतो आहे. करोनानंतर जगभरात शेअर बाजारात तेजी दाखविणार्या देशात भारतीय शेअर बाजार दुसर्या क्रमांकावर आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते आता सेन्सेक्सचे लक्ष्य 50 हजारांचे आहे आणि मार्च 2021 पर्यंत ते शक्य वाटते आहे.

सतत थोडी थोडी विशेष करून मंदीत गुंतवणूक करत रहा, हा सल्ला न मानणारे गुंतवणूकदार आता तेजीच्या गाडीत बसायला सरसावले आहेत. ज्यांनी तेजी-मंदी न करता आमचा सल्ला घेऊन सातत्याने संयमाने गुंतवणूक केली त्यांना आता त्यांच्या गुंतवणुकीने भांडवलवाढीचा प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. नेहमीच वरच्या लेव्हलला आणि तेजीच्या हिंदोळ्यावर बसण्यास आतुर गुंतवणूकदार अशा तेजीच्या भुलभुलैय्यात नक्की फसतात. पैसा आहे आणि संधीसाधू गुंतवणूकदारांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना तेजीत अडकवणारे तथाकथित सल्लागार त्यांना बरोबर तेजीत अडकवतात.

सध्याच्या तेजी वातावरणात आपणास पैशाची गरज आहे आणि इतर कोणताही पर्याय नसल्यास अवश्य आपली जुनी गुंतवणूक काढून घ्यावी. जर आपले वित्तीय लक्ष्य साध्य वेळेआधीच पूर्ण होते आहे असे वाटत असल्यास अवश्य गुंतवणूक काढून घ्यावी.

आपली गुंतवणूक ही एखाद्या Thematic फंडात असल्यास अथवा पुढील वर्षभरात पैशाची गरज असल्यास आणि अपेक्षित गुंतवणूक परतावा मिळत असल्यास अवश्य गुंतवणूक मोकळी करावी.जर आपली गुंतवणूक SIP प्रकारात असल्यास आपणास Cost of Arrage आणि Power of Compounding चा लाभ मिळतो. गुंतवणूक काढतांना Tax आणि Exit load याशिवाय Lock in Period चा विचार करावा.

सध्याच्या काळात दीर्घ काळासाठी (5 ते 6 वर्षे) गुंतवणूक असल्यास Lumsum (एकदम) गुंतवणूक करण्याऐवजी STP द्वारे गुंतवणूक करावी.

सल्लागाराचा/ फंडाच्या प्रतिनिधीचा सल्ला घेऊनच SIPअथवा Lumsum अथवा एसटीपी चा निर्णय घ्यावा. आपलेFinancial goal पूर्ण होईपर्यंत नफा घरात घेऊ नये. तेजी-मंदीची 2/3 आवर्तने बघितल्याशिवाय भांडवलवाढीचा सूर्य उगवत नाही. सध्याच्या वातावरणात गुंतवणुकीच्या पीचवर सिंगल रन घेत रहावे. चौके/छक्के (4/6) मारण्याच्या नादात विकेट जाईल. आपण सुरू केलेली SIP परतावा न बघता कन्टीन्यू करावी.

एसआयपी चा फायदा 10/15 वर्षानंतर चांगला मिळतो. परतावा न बघता गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बघावा. गुंतवणूक करतांना इव्हेंट/इमोशन आणि इकोनॉमी लक्षात घेऊनच इक्विटीचा विचार करावा. गुंतवणूक करतांना आपली जोखीम क्षमता/बाजारातील जोखीम/कॉस्ट (Cost) टाईम आणि आपली मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. रिटर्न आपल्या हातात नाही परंतु जे आपल्या हातात आहे ते समजून घेणे आवश्यक आहे.

भविष्यात मला बाजारात प्रचंड मोठी तेजी वाटते आहे. Infrastructnre/ IT/ Chemical/ Commadity/ PSU झडण यात तेजी जास्त दिसेल. तेजी समजून घेण्यासाठी GDP ग्रोथ,/Consumption, Demand, ... Flow विदेशी गुंतवणूक, वित्तीय तूट, महागाई, मनी सप्लाय, विदेशी चलन आणि कच्च्या तेलाचे दर हे सर्व तपासून बघावे संपर्कात आल्यास विस्तृत चर्चा होऊ शकते. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंती कोणत्या दिशेने येणार याची दिशानिर्देश फक्त सल्लागार/प्रतिनिधीच देऊ शकतो. बघा पटतेय का?