जिल्ह्यात आज 'इतक्या' नागरिकांनी घेतली लस

जिल्ह्यात आज 'इतक्या' नागरिकांनी घेतली लस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) दिवसभरात पहिला आणि दुसरा डोस दोन्ही मिळून जवळपास २१ हजार ७५८ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १४ लाख ७७ हजार ९९२ नागरिकांना लस देण्यात आली आहे...

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे.

शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता. परंतु, गेल्या आठवड्यात जिल्ह्याला ४३ हजार लसी उपलब्ध झाल्याने या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेल्या दीड महिन्याभरापासून लसींचा तुटवडा असल्याने 300 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते. आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) ३३ तर जिल्हाभरातील १०२ व मालेगाव (Malegaon) ९ अशा एकूण १४४ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात ९ हजार ६५८ जणांना पहिला डोस देण्यात आला. यात नाशिक महापालिका हद्दीत ५७४, ग्रामिण जिल्ह्यात ८ हजार ६७, मालेगाव १ हजार १७ असे लसीकरण झाले आहे.

तर १२ हजार १०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. यात नाशिक महापालिका हद्दीत ४ हजार १४६, ग्रामिण जिल्ह्यात ७ हजार ४७४, मालेगाव ४८० असे लसीकरण झाले आहे.

समाजकल्याण येथे कोवॅक्सिनच्या (covaxin) दुसऱ्या डोससाठी लसीकरण होणार आहे. त्याव्यतिरिक्त उद्या महापालिका हद्दीत कुठेही लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com