वादळी वार्‍याने घरे भुईसपाट

वादळी वार्‍याने घरे भुईसपाट

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

फोपशी, ता.दिंडोरी येथे वाढळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने तीन घराचे पत्रे उडून पडझड झाल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने यात जीवित हानी टळली असली, तर दोघा शेतकर्‍यांचे संसार रस्त्यावर आले आहे. दिंडोरी तहसिलदार पंकज पवार यांनी घटनेची माहिती घेवून तलाठी यांनी तत्काळ पंचनामा केला आहे.

काल सांयकाळी 6 वाजेच्या दरम्यान फोपशी येथे वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. यात वंसत भगवान बागूल यांचे फोपशी शिवारात मळ्यात असलेले घराचे संपूर्ण पत्रे वादळात उडून गेले. तसेच घराच्या भिंतीही कोसळल्या. सुदैवाने घरातील मानसे प्रसंगावधान राखून घराबाहेर पळाल्याने जीवित हानी टळली घराचे पत्रे सुमारे शंभर ते दोनशे फूट अंतर येऊन पडले तर एक पत्रा झाडावरच फांद्यावर जावून अडकला.

दरम्यान गुलाब गोविंद पाडवी, रामदास चंदर चौधरी यांचेही घराचे पत्रे उडून भिंतीची पडझड झाली आहे. अनिल गावित यांनी काढलेल्या कांदाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान फोपशीचे सरपंच वसंत जाधव यांंनी घटनेची माहिती महसूल विभागास कळवली असता, तलाठी महेश भोये यांनी नुकसानग्रस्त घराचे पंचनामे केले. यावेळी सरपंच वसंत जाधव, उपसरपंच प्रकाश चौधरी, दिपक शिरसाट यांनी वसंत बागूल यांचे संपूर्ण घर पडल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या निवार्‍याची तात्पुरती व्यवस्था करीत शासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com