बलायदुरी येथे घराला लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान

बलायदुरी येथे घराला लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे सकाळी दहाच्या सुमारास घराला आग लागली.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे घरमालकांनी सांगितले. ह्या आगीत नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेली रोख रक्कम ५ लाख रुपये, ४ तोळे सोने, जीवनावश्यक वस्तू, भांडे, कपडे आदी भस्मसात झाले. एकूण १० ते १२ लाखांची नुकसान झाल्याचा दावा घरमालकांनी केला आहे. ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बलायदुरी ता. इगतपुरी येथील कैलास लुक्कड भगत हे आपल्या परिवारासह गावी राहतात. त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू आहे.

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे कैलास भगत यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी इगतपुरी येथील महिंद्रा कंपनी आणि इगतपुरी नगरपालिकेचे अग्निशामक पथकाने आग आटोक्यात आणली.

घरमालक कैलास लुक्कड भगत यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे घराला ही आग लागली. घराच्या बांधकामासाठी स्वतःचे आणि कर्जाऊ आणलेले रोख पाच लाख रुपये, ४ तोळे सोने, कपडे, अन्न धान्य आदी साहित्य आगीत भस्मसात झाले. ह्या आगीमुळे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com