कोंबड्या चोरल्याचा संशय; हॉटेल मालकानेच केला मजुराचा खून

कोंबड्या चोरल्याचा संशय; हॉटेल मालकानेच केला मजुराचा खून

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील (Bharam Tal Yeola) भारम याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराचा मालकाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...(Murder case registered at yeola police station)

अधिक माहिती अशी की, भारम (Bharam) याठिकाणी संशयित आरोपी शेख जमीर मेहबूब याचे बेस्ट नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी बाळू गणपत नळे (वय ४९) हे मजुरीचे काम करत होते. ३ जुलै २०२२ रोजी हॉटेलचा मालक शेख जमीर याने हॉटेलमधील कर्मचारी असलेल्या बाळू नळे (Balu Nale) यांच्यावर कोंबड्या चोरून विक्री केल्याचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

राग अनावर झाल्याने लाथाबुक्यांसह छातीवर, पोटावर पाठीवर गंभीर दुखापत झाली. या घटनेत अतिरक्तस्राव शरीरात झाला. त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik district hospital) उपचार सुरु होते. मात्र, काल (दि १५) रोजी बाळू नळे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मुलगा अर्जुन बाळू नळे यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात (Yeola taluka police station) तक्रार दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. राजपूत (Police Inspector U N Rajput) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com