मुलींसाठी वसतिगृह होणार सुरु

मुलींसाठी वसतिगृह होणार सुरु

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मराठा समाजाच्या (Maratha Community) विद्यार्थ्यांसाठी (students) प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह (Hostel) सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

याचाच भाग म्हणून नाशिक (nashik) येथे 200 मुलींचे वसतिगृह (Girls Hostel) सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी बुधवारी दिली.

इतर मागासवर्ग समाजातील (Backward class society) विद्यार्थ्यांना (students) मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा (Educational facilities) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका आहे.

नाशिक (nashik) येथे सुरू करण्यात येणार्‍या वसतिगृहात सारथी आणि महाज्योती या महामंडळाच्या त्यांच्या लक्षीत गटातील प्रत्येकी 75 मुलींना प्रवेश देण्यात येणार असून उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत (Department of Higher Technical Education) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींना प्रवेश असे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे, असे पाटील म्हणाले.

यशवंतराव चव्हाण जनशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत (Yashwantrao Chavan Jan Shatabdi Mahotsav Yojana) नाशिक येथे बांधण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठीच्या वसतिगृहात सारथी आणि महाज्योती या महामंडळाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. या वसतिगृहाच्या दैनंदिन कामकाजावर सारथी महाज्योती महामंडळाचे नियंत्रण असेल तसेच वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सारथी महामंडळ करेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com