रुग्णालयातील कचरा लोकवस्तीत

रुग्णालयातील कचरा लोकवस्तीत
कचरा

जुने नाशिक । Old Nashik (प्रतिनिधी)

येथील महापालिका प्रभाग 14 मधील मुंबई महामार्गालगत मुंबईनाका परिसरातील आझादनगर या भागात एका मोठ्या हॉस्पिटलमधून आतील घाण, कचरा व रुग्णांना वापरण्यात आलेले साहित्य थेट लोकवस्ती भागात टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याबाबत महापालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी युनिटी अमन फाऊंडेशनचे संस्थापक साजिद मुलतानी यांनी केली आहे.

महामार्गालगत असलेल्या या लोकवस्ती भागात अनेक हॉस्पिटल्स आहेत. सध्या सर्वत्र करोनामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात दवाखान्यातील वापरलेले साहित्य व इतर घाण लोकवस्तीत टाकल्यामुळे तसेच काल पाऊस पडल्याने ती घाण संपूर्ण परिसरात पसरली आहे.

अशा वातावरणात लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत महापालिकेने त्वरित कारवाई करून संबंधित रुग्णालयाला नोटीस द्यावी व यापुढे असे प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com