अव्वाच्या सव्वा बिल आकारणे भोवले; शहरातील बड्या हॉस्पिटलचा परवाना रद्द

करोना अपडेट
करोना अपडेट

नाशिक | प्रतिनिधी

करोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणे नियमाप्रमाणे रेकॉर्ड न करणे यासह विविध कारणांमुळे चर्चेत आलेले गंगापूररोड येथील एक मोठ्या हॉस्पिटलवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कडक कारवाई करत हॉस्पिटलचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे...

शहरातील पॉश अशा गंगापूर रोड वरील विद्या विकास सर्कल येथील मेडिसिटी हॉस्पिटल बाबत मागील काही दिवसापासून सतत तक्रारी मिळत होते, तर मीडियामध्ये हा विषय चर्चेत होता.

महापालिकेचे आयुक्त जाधव यांनी गंभीरपणे दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

हे हॉस्पिटल करोना बाधित रुग्णांकडून अधिक पैसे वसूल करीत होते, याठिकाणी रुग्ण बिलासाठी तासनतास ताटकळत बसत होते.

महापालिकेच्या ऑडिटरला देखील माहिती देत नव्हते. काही रुग्णांना कच्च्या कागदावर बिले देत होते.

शासकीय नियमाप्रमाणे बेडच्या 80 व 20 टक्के असा स्वतंत्र हिशेब रेकॉर्ड नव्हते. चौकशी अधिकाऱ्यांना असे प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी आयुक्तांकडे अहवाल सादर केला. यानंतर आज महापालिका आयुक्त जाधव यांनी हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com