कसबे सुकेने | Kasbe sukene मौजे सुकेने, ओणे व परिसरात गेल्या आठवड्या पासून बिबट्याचा मुक्काम कायम असून बिबट्याने रविवारी पहाटेच्या सुमारास घोड्याचा बळी घेतला आहे. .मौजे सुकेने येथील दत्तात्रेय मोगल यांच्या द्राक्ष बागेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय घोडा ठार झाला. मागील आठ दिवसात अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान या घटनेमुळे वस्तीवर दहशतीचे वातावरण असून परिसरातील लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.मागील काही दिवसापासून बिबट्याचा या परिसरात मुक्काम कायम असून परिसरातील अनेक कुत्री बिबट्याचा हल्ल्याला बळी पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम असून वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा.- सतिश मोगल, ग्रामस्थ