पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यगौरव पुरस्कार

पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यगौरव पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अ.भा. मराठी पत्रकार परिषद (मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या Nashik Taluka Marathi Press Association कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते करोनाचे नियम पाळत करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरणही झाले.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक डॉ. राहुल रनाळकर, आ. सरोज आहिरे, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला, राष्ट्रवादीचे विशाल गायकर, गणेश गायधनी, नगरसेवक जगदीश पवार, दीपक बलकवडे, पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कला, क्रीडा, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह 47 जणांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे यांनी केले, तर सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. अरुण बिडवे यांनी आभार मानले.

गिते, सचदेव यांचा गौरव

मान्यवरांच्या हस्ते ‘देशदूत’चे उपसंपादक विजय गिते, ‘देशदूत टाईम्स’च्या प्रतिनिधी गीतिका सचदेव यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे इतर पत्रकारांसह वृत्तपत्र विक्रेते निलेश खरात (देवळाली कॅम्प), संतोष निरभवने (नाशिकरोड) रमेश महाले (नाशिक ) उद्योजक दीपक बलकवडे, नितीन गायकर (आरोग्य व सामाजिक), भारत पिंगळे (पर्यावरण), राजेंद्र सोमवंशी (साहित्यिक), जगदीश पवार, सुषमा पगारे, शाम गोहाड, डॉ आशा उगले, पवन कहांडळ (सामाजिक ) शैक्षणिक क्षेत्रात शीतल पगारे (लाखलगाव), सरला सोनवणे (कोटमगाव) आकाश चव्हाण (नाशिकरोड), कला क्रीडाक्षेत्रात युवा गायक ऋषिकेश रिकामे (विंचूर गवळी ), कुस्तीपटू अंजिक्य तुंगार (शिंदे), सर्पमित्र मंगेश परदेशी(भगूर) तसेच सामाजीक संस्था शंकर एज्युकेशन सोसायटी (देवळाली कॅम्प ), संत तुकाराम महाराज गुरुकुल व वृद्धाश्रम (माडसांगवी ), वृक्षवल्ली संस्था (म्हसरूळ ), संतोष कटारे फाऊंडेशन(दे.कॅम्प) यांच्यासह नाशिकचे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी परीक्षम घेणार्‍या डॉ. शंकर बोर्‍हाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या डॉ.गुजर सुभाष हायस्कुलच्या शेख सोफिया (प्रथम), नंदिनी पवार (द्वितीय) भूमिका कोचरमुथे (तृतीय) यासह परी हेमनानी, आफिया खान, विद्या धोंगडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

जिल्हा क्रीडा कार्यालय

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा रस्तंभ असून, शासन व समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो. शासनाचे ध्येयधोरणे, विकासात्मक योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम हे सातत्याने पत्रकारांमार्फत होत असते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त क्रीडा पत्रकारांचा सन्मान सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी अर्चना देशमुख, विभागीय माहिती कार्यालाच्या सहाय्यक संचालक मोहिनी राणे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महेश पाटील, उधाण युवा बहुउद्देशिय मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश बोडके, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे, किरण डोळस, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचालिका शोभा बोडके, प्रकाश पवार, स्काऊट व गाईडच्या जिल्हा संघटक हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.

सातपूरला पत्रकार दिन

सातपूरच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा झाला. प्राचार्य प्रमोद कांगुणे यांच्या हस्ते पत्रकार सातपूर विभागातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक सुभाष पाटील यांनी पत्रकार दिनाचे महत्व सांगीतले. ज्ञानेश्वर आंधळे व रविंद्र केडीया यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी सातपूर विभागातील ज्येष्ठ तथा देशदूतचे मुख्य वार्ताहर रविंद्र केडीया, गोकूळ सोनवणे, वसंत आव्हाड, नामदेव पवार, ज्ञानेश्वर आंधळे, नंदकुमार जाधव, सुनिल पगारे, परमेश्वर आंधळे, बंटी आढाव, तुषार ढेपले, रमेश खरात, सिद्धार्थ लोखंडे, भाऊसाहेब बोराडे ,विशाल देशपांडे, राकेश पवार, शशिकांत निर्मळ, उपमुख्याध्यापिका उषा कदम, संजय डेर्ले, रामदास राजोळेंसह शिक्षक- शिक्षकेतर, विद्यार्थी उपस्थित होते. कला शिक्षिका ज्योत्सना पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केलेले होते.

सूत्रसंचालन गणपतराव पोटे यांनी केले तर आभार विनीत पवार यांनी मानले. छत्रपती शिवाजी विद्यालयात पत्रकार दिन साजरा झाला. या वेळी परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, दादाजी शिंदे,डॉ. के.के.जाधव, संपतराव आहेर, रामनाथ शिंदे, मुख्याद्यापक सखाराम पवार, शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते, सुदाम दाणे, संपतराव हरक, विजय धुमाळ आदींसह संचालक व शिक्षक उपस्थित होते. महादेवनगर मित्र मंडळ मसालाज वन येथे महादेवनगर मित्र मंंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय अहिरे, संजय तायडे, अतुल पाटील आदींसह पदाधिकार्यांनी परिक्षम घेतले. मनपा सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या पूढाकाराने मातोश्री मिनाताई ठांकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले . यावेळी पत्रकारांचा प्रभाग समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी विभागिय अधिकारी एस.के. काले, तानाजी निगळ, राजू सोनवणे आदी उपस्थित होते.

सावानाकडून कातकाडे यांना पुरस्कार

सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दै. ‘देशदूत’चे प्रतिनिधी वैभव कातकडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सावाना नाशिकचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, कार्यवाह शंकर बोराडे तसेच प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सह सचिव शंकर बोर्‍हाडे, श्रीकांत बेनी अ‍ॅड.अभिजित बगदे, वसंतराव खैरनार उपस्थित होते

अमृतवन परिवाराकडून जोशींचा गौरव

तवली फाटा येथील अमृत वन उद्यानात अमृतवन परिवाराच्या वतीने पत्रकार दिनानिमीत्त ज्येष्ठ ् पत्रकारांंचा सनमान करण्यात आला. ज्येष्ट अर्थतज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर याांंच्या हस्ते पत्रकार देशदूतचे उपसंपादक नरेंद्र जोशी यांच्यासह विविध पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर काकड यांनी केले. अमृतवन हास्यक्लबच्या अध्यक्षा जयश्री गावीत यांनी प्रास्तावीक केले. शिवाजी महानुभाव, एकनाथ दिघे, अंबादास शेलार, सुनीता काकड, सोनाली भोजणे, कोयल माळी, वर्षा तिडके, पुजा माळी, सुदर्शन काकड, कांंता हिरे, तुषार गांगुर्डे, अश्वीनी जाधव आदींसह क्लबचे सदस्य उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com