'उमेद- शोध नाविन्याचा' उपक्रमातील विजेत्यांचा सन्मान

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर व जिल्हा परिषदेच्या संयुक्त उपक्रम
'उमेद- शोध नाविन्याचा' उपक्रमातील विजेत्यांचा सन्मान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) माध्यमातून या उत्पादनांना एक लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार असून,

या संकल्पनांतून साकारलेल्या पहिल्या तीन उत्पादनांची खरेदी करुन जिल्हा परिषद त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी दिले.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण भागातील (rural area) मुलांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘उमेद- शोध नाविन्यांचा’ या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पातून निवडलेल्या तीन उत्तम प्रकल्पांचा पूरस्कार वितरण (Award distribution) काल एनइसीच्या सभागृहात करण्यात आला.

यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा (Vikram Sarada, Chairman, Nashik Engineering Cluster), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, क्लस्टरचे संचालक हेमंत राठी (Cluster Director Hemant Rathi), नरेंद्र गोलीया, नरेंद्र बिरार, सुला विनीयार्ड चे उपाध्यक्ष संजिव पैठणकर, उद्योजक चेतन प्रभू, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रविंंद्र परदेशी, क्लस्टरचे मुख्य कार्यकारीअधिकारी एस.के.माथूर आदी मान्यवर होते.

यावेळीपहिल्या फेरित जिल्हातील दिंडोरी (dindori), इगतपूरी (igatpuri), निफाड (niphad), सिन्नर (sinnar), व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या 6 तालुक्यांतील सुमारे 800 जणांनी सहभाग घेतला होता. त्यातून सादर केलेल्या 91 नवीन उपक्रमांच्या प्रकल्पांचा सहभाग होता. परिक्षकांच्या परिक्षणानंतर 12 प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यातून तीन उत्कृष्ट प्रकल्पांना पूरस्कृत करण्यात आले.

या 12 प्रकल्पांच्या विकासासाठी त्यांना विविध यांत्रिकी पाठबळ क्लस्टरच्या माध्यमातून दिले जाणार असून, या प्रकल्पांना उत्पादन प्रक्रियेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध स्थरावील सहकार्य देखिल केले जाणार असल्याचे नरेंद्र गोलीया (Narendra Golia) यांनी सांगितले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरुवातीला या 12 प्रकल्पांची ध्वनी व चित्रफित सादर करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या तीन उत्कृष्ट प्रकल्पांना पूरस्कृत करण्यात आले. त्यात प्रथम पूरस्कार अमोल कचरु मोहीते (नारळापासून सूके खोबरे बनवण्याचे सयंत्र)15 हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषक आविष्कार संजय अनर्थे (पेरणी साठीचे सूलभ यंत्र) 10 हजार रुपये रोख, तर तृतीय पारितोषक भक्ती दरेकर व सेजल ठाकरे (शेती उत्पादनांची सूरक्षित साठवण व वाहतूक) 10 हजार रुपये पूरस्कार देऊपन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक करताना नरेंद्र गोलीया यांनी नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुचलेल्या कल्पनांचा आविष्कार म्हणजेच ‘इनोव्हेशन’ असल्याचे सांगून, आपल्या कल्पनाना वाव देऊन नाविन्यांचा शोध घेण्याचे आवाहन केले.हेमंत राठी यांनी आभार मानले. एस के. माथूर यांन पूरस्कारांची घोषणा केली. यावेळी विद्यार्थी पालक व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com