करोना योद्ध्यांचा सत्कार

करोना योद्ध्यांचा सत्कार

निफाड । प्रतिनिधी Niphad

करोनामुळे ( corona ) निधन झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करणे, गोदावरी घाटाची स्वच्छता, करोना काळात गावात स्वखर्चाने औषध फवारणी, गावात स्वच्छता मोहीम राबविणे आदी कामे करणार्‍या नांदूरमध्यमेश्वर येथील करोना योद्ध्यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( District Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांनी सत्कार करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारीत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

नांदूरमध्यमेश्वर ( Nandurmadhyameshwar )येथील तरुण सोमनाथ इकडे, सचिन वाघ, किरण आमनकर, सोपान वाघ, सुमित शिंदे, शुभम शिंदे, किशोर धुमाळ, प्रभाकर चव्हाणके, नयन जोशी, दत्ता सोनवणे, सोयब शेख, समाधान नाईकवाडे, देवीदास उबाळे, श्रीकांत इकडे आदी तरुणांनी करोना प्रादुर्भावाच्या काळात गावातील प्रत्येक गल्ली, चौकात डासनिर्मूलन औषधांची फवारणी करून करोना काळात जनजागृती केली. तसेच गोदावरी नदीजवळील घाटावर पडलेल्या पुरातन मूर्तीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत हा परिसर स्वच्छ केला. तसेच गंगास्नानासाठी येणार्‍या भाविकांना कपडे बदलण्यासाठी पत्रे लावून शेड तयार केले.

नदीकाठावर पडलेले पुरातन कपडे, कचरा यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून करोना काळात नागरिकांना मदतीचा हात दिला. या तरुणांच्या कार्याची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या तरुणांचा सत्कार करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

याप्रसंगी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला तहसीलदार प्रमोद हिले, येवला न.पं. च्या मुख्याधिकारी संगिता नांदूरकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जि.प.चे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला कृउबाचे प्रशासक वसंत पवार, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, शिवाजी सुपनर, पं.स. सदस्य मोहन शेलार, वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, उपअभियंता उमेश देशमुख,

निफाडचे गटविकास अधिकारी संदिप कराड, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पो.नि. संदीप कोळी, लासलगावचे पो.नि. राहूल वाघ उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी येवला व निफाड तालुक्यातील करोना सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच करोना बाबत सुरू असलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबतची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com