<p>सातपूर</p><p>पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील बिथले स्पर्धेत निवेकच्या अॅथलीट्सने उत्तूंग कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचा निवेकच्या वतीने सत्कार करण्यात आला.</p>.<p>पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या स्थानावरुन रौप्यपदक पटकावत वेदिका सालसिंगीकर यांनी निवेकच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. त्यासोबतच या स्पर्धेत आपली दमदार सुरूवात करीत काव्या शाह यांनीही वेगळी छाप सोडली होती. त्यानिमित्त निवेक अध्यक्ष संदीप गोयल, उपाध्यक्ष जनक सारडा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा सचिव पंकज खत्री, तरण तलाव उपसमिती अध्यक्ष प्रशांत डाबरी, जलतरण प्रशिक्षक हिरेन बुझरुक आदींसह पालक उपस्थित होते.</p>