चंद्रकिशोर पाटील यांचा पर्यावरण दूत म्हणून गौरव

चंद्रकिशोर पाटील यांचा पर्यावरण दूत म्हणून  गौरव

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Corporation) चंद्रकिशोर पाटिल यांना प्रजासत्ताक दिनी (Republic Day) 'नंदिनी नदी संवर्धन' कार्यात करत असलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पर्यावरण दूत (Environmentalists) म्हणून गौरविण्यात आले...

यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Chandrakant Pulkundwar) यांचे हस्ते शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात पाटील यांच्या कार्याचा गौरव 'स्वच्छाग्रही' म्हणून केला होता. तसेच चंद्रकिशोर पाटील हे शहर स्वच्छतेसाठी नेहमीच झटत असतात.

दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त विजय कुमार मुंडे, गोदावरी संवर्धन कक्ष डॉ आवेश पलोड यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com