राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ५२ जेष्ठ क्रीडा शिक्षकांचा सन्मान

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ५२ जेष्ठ क्रीडा शिक्षकांचा सन्मान

नाशिक | Nashik

क्रीडा संस्कृती फाउंडेशनच्या (Sports Culture Foundation) वतीने दरवर्षी क्रीडा (Sports) क्षेत्रात मोलाचे योगदान असणाऱ्या क्रीडा शिक्षक, क्रीडा संचालक, क्रीडा संघटक, प्रशिक्षक यांना सन्मानित (Honored) केले जाते.

या वर्षीही राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) कालिका देवी मंदिर हॉलमध्ये (Kalika Devi Temple Hall) आयोजित कार्यक्रमामध्ये गेल्या ५० ते ५५ वर्षे क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे निवृत्त क्रीडा शिक्षक, संचालक, संघटक, प्रशिक्षक यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना संजय पाटील (Sanjay Patil) यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीच्या उतुंग वाटचालीत त्यांच्या गुरुचा सर्वात मोलाचा वाटा असतो. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ शिक्षक, संचालक, प्रशिक्षक यांचा सन्मान करणे हे मी भाग्य समजतो असे ते म्हणाले.

तर केशव पाटील (Keshav Patil) म्हणाले की, या जेष्ठ मान्यवरांकडून अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.

तर सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये रविंद्र मोरे, आबा चव्हाण, मोहन चंगेडे, रमेश मारवाडी, दिलीप लोंढे, नितीन अहिरराव, माणिक गायकवाड, बी.डी. पाटील, उज्वला पाटील- बागुल, विलास वाघ, देव गांगुर्डे, आर.डी जाधव, टी.टी.जाधव, नामदेव शिंदे, आबा घाडगे, शंकरराव खळगे, वसंत मोरे, बी. डी.पाटील, कारभारी सांगळे, शंकर वाघ, जे. के. गुरुळे, चंद्रकांत भाग्यवंत, मधुकर देशमुख, सुरेश गायधनी, नामदेव मुठाळ, अशोक बोराडे, राजीव पाटील, रमेश देशमुख, सुनील आहेर, अशोक मोजाड, राजेंद्र शिंदे, राजेश क्षत्रिय, अशोक कचरे, शंकर मांदगुंडी, नंदकिशोर खैरनार, अरुण पवार, उल्लास कुलकर्णी, प्रकाश दायमा, डॉ. बाजीराव पेखळे, सुनील गायकवाड, अजय रॉय, रवींद्र मेतकर, नामदेव महात्मे, यांचा समावेश होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय जाधव (Sanjay Jadhav) नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे (Avinash Tile) छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, आनंद खरे यांच्या हस्ते सत्कारार्थीचा श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे (Ashok Dudhare) यांनी तर सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशांक वझे, रमेश वेलजाळी, दीपक निकम, मनीषा काठे आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com