करोना योध्यांचा गौरव

करोना योध्यांचा गौरव

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

करोना सारख्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रं -दिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या करोना योध्यांचा गौरव करण्यात आला.

दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा सेविका,गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे कार्य कौतुकास्पद असून ,त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त असल्याने, कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले असल्याचे अहिवंत वाडी जिल्हा परिषद सदस्या रोहिनी गावीत यांनी व्यक्त केले.

दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा -गट प्रवर्तक यांना जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावीत यांच्या वतीने गौरवपत्र ,साडी देवून कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी गावित बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असताना, जनतेची सेवा करण्यासाठी देवाच्या रूपाने धावून आले ते पोलिस, आरोग्य कर्मचारी, व समाजातील प्रमूख घटक पंरतू आरोग्य सेवेतील काहीसे दुर्लक्षित असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ज्या कोरोणा कालावधीत वरिष्ठांचे आदेश प्रमाण मानून सदैव न डगमता अहोराञ सेवेत तत्पर असलेल्या सेवेतील अतिशय महत्वाच्या रण -रागीणी आहेत असे मान्य करून माझ्या अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा सेविका,गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेवक यांचा सन्मान केला असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावीत याःनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी, पंचायत समिती माजी सभापती आनंदा चौधरी,तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी,वैद्यकीय अधिकारी डॉ साबळे,सदु गावित ,सरपंच पंढरीनाय भरसट, प्रहारचे तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ,नारायण तुंगार आदीं सह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com