गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नाशिक

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नॅशनल कॉलेजमध्ये पुन्हा मुलींनीच मारली बाजी

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | प्रतिनिधी

येथील नॅशनल ज्युनियर कॉलेजमधील बारावी परीक्षेत कॉलेजस्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकाविणा-या गुणवंंत विद्यार्थ्यांचा सत्कार कॉलेज व्यवस्थापन मंडळातर्फे करण्यात आला.

युथ एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी संचलित या कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.३९ टक्के लागला होता. यामध्ये सायन्यसचा निकाल ९९.०६ टक्के तर कॉमर्सचा निकाल ९६.५२ टक्के आणि आर्टसचा निकाल ८८.४६ टक्के लागला. परंपरेप्रमाणे येथेही मुलींनीच बाजी मारली होती. कॉलेजच्या या घवघवीत यशाबद्दल कॉलेज व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थांचे कौतुक करण्यात आले आहे.

सय्यद अदीबा बशिर हिने ९२.४६ गुण प्राप्त करून कॉलजमध्ये पहिला क्रमांक पटकविला. शेख तैबा रिजवान हिने ८९.६० व शेख दानिया युसुफ हिने ८४ टक्के गुण मिळविले. आर्टसचे ३१, कॉमर्सचे २१ तर सायन्समधील ६ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले.

कॉलेजमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष हाजी नासिर उर्फ बबलू पठाण, उपाध्यक्ष अलिम शेख, सचिव प्रा.जाहीद शेख, सहसचिव एजाज काझी , कार्यकारी सदस्य अॅड. बाबा सय्यद, सलिम सादीक, प्राचार्य सादीक शेख, उपप्राचार्य डॉ. नुरे ईलाही शाह, तनवीर शेख, मौलाना हाफीज जाहीद व पालक उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com