
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जागतिक दर्जाच्या आव्हानात्मक सहनशक्ती स्पर्धेत आयर्न मॅन ठरलेले डॉ.सुभाष पवार ( Iron Man Dr. Subhash Pawar )यांचा दिल्लीत सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांचे जगभरातील लोकांनी कौतुक करत त्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
ऑल इंडिया सैनी(माळी) समाजाचा राष्ट्रीय मेळावा दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे पार पडला.या मेळाव्यासाठी जगभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा, उत्तर प्रदेशचे माजीमंत्री धर्म सिंह सैनी,राष्ट्रीय अध्यक्ष दिलबाग सैनी उपस्थित होते.
या मेळाव्यात समाजातील देशभरात उल्लेखनीय काम करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिकच्या डॉ.सुभाष पवार यांनी आयर्न मॅन स्पर्धा जिंकल्याबद्दल त्यांचा दिल्ली येथे उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य ह्यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. डॉ. सुभाष पवार वयाच्या 66 व्या वर्षी भारतातील सर्वात वयोवृद्ध आणि वेगवान आयर्न मॅन बनले.
त्यांनी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कोझुमेल, मेक्सिको येथे 15.06 तासांच्या समाप्तीच्या वेळेसह हे यश मिळवले जे 17 तासांच्या कट ऑफ वेळेच्या 2 तास आधी आहे.या जागतिक दर्जाच्या आव्हानात्मक सहनशक्ती स्पर्धेत त्यांनी 1.16 तासांत 4घच् पोहणे, 180घच् सायकलिंग 6.59 तासांत आणि 42घच् धावणे 6.27 तासांत पूर्ण केलेया स्पर्धेत जगभरातील 2200 हून अधिक स्पर्धक सहभागी होते आणि त्यांच्या 65-69 वयोगटातील 15 जणांपैकी तो एकमेव भारतीय सहभागी होता.त्यांचा या मेळाव्याच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.