स्कूल बसचालकाचा प्रामाणिकपणा

करंजीखुर्द । वार्ताहर | Karanji Khurd
स्कूल बसचालकाचा प्रामाणिकपणा

खेडलेझुंगे (khedle zunge) येथील योगिराज तुकाराम बाबा गुरुकुलच्या स्कूल बसचालक समाधान जाधव यांनी विद्यार्थ्याबरोबर (students) आलेल्या पालकाचे 5 लाख रुपये प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतूक होत आहे.

समाधान जाधव हे नेहमीप्रमाणे स्कूलबसमधून (School bus) आदेश अविनाश घोटेकर या विद्यार्थ्याला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पालकांकडून चुकून मुलाच्या टिफिन बॅगऐवजी (Tiffin bag) त्यासारखी दिसणारी बॅग मुलासोबत दिली. या बॅगेत 5 लाख रुपये होते. ही बाब चालक जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब विद्यार्थ्याचे (students) आजोबा बाळू गणपत घोटेकर यांच्याकडे ही बॅग परत केली.

अलीकडे प्रामाणिकपणा कमी होत असताना जाधव यांनी दाखविलेल्या कृतीने आजही प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे अधोरेखित झाले. दरम्यान, रक्कम परत मिळाल्याबद्दल पालकांनी समाधान जाधव यांचा सत्कार केला. याप्रसंगी शाळेचे संचालक रवींद्र गोरडे, पालक बाळू घोटेकर, नवनाथ घोटेकर, गोरख वैद्य, दिनकर गोरडे, अशोक नवले यांचेसह शिक्षक (teachers) व विद्यार्थी (students) उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com