घंटागाडी सेवकांचा प्रामाणिकपणा

घंटागाडी सेवकांचा प्रामाणिकपणा

नाशिकरोड । प्रतिनिधी Naklshikroad

घरातील आवरासावर करतांना नजरचुकीने कचर्‍यासोबत रोख रक्कम ( Cash ) गेली असता घंटागाडी कामगारांनी ( Ghantagadi Workers ) ती प्रामाणिक पणे परत केल्याने या कामगारांचे कौतुक होत आहे.

जेलरोडच्या पिंपळपट्टी रोड येथील महिला रंजना भालेराव या दसरा, दिवाळीमुळे घराची आवरासावर करीत असताना त्याच्या कडील पाच हजार रुपये कचर्‍याच्या डब्यात पडले. घंटागाडी आपल्या निर्धारित वेळात गेल्यानंतर भालेराव यांनी कचर्‍याचा डबा घंटागाडीत टाकला. घरात येऊन बघता तर त्याच्या लक्षात आले की कचर्‍या सोबत आपली रोख रक्कम गेली. त्यानी त्वरीत तनिष्क एंटरप्राइजचे सुपरवायझर ओम बोबडे, राहुल मोरे यांना याबाबत कळवले.

त्यानी या भागातील घंटागाडी क्र. एम.एच 15 एफएफक्यू 0362 या गाडीवरील चालक गणेश साळुंखे व कामगार उमेश कोळी, पितांबर अलकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी कचरा वेगळा केला. त्यात पाच हजारांची रक्कम मिळून आली. सदरची रक्कम रंजना भालेराव यांना परत करण्यात आली. परिसरातील नागरिक, महिला यांनी कामगारांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com