होमिओपॅथी मानवतेसाठी वरदान

होमिओपॅथी मानवतेसाठी वरदान

नाशिक | Nashik

आज संपूर्ण विश्व कोविड-19 या आजारांनी ग्रासले आहे. करोना होऊ नये म्हणून आजतरी कुठलिही लस विकसित नसल्याने जग एका भीषण आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे.

खात्रीशिर लस किंवा वॅक्सिन उपलब्ध नसल्याने हा आजार होऊच न देणे हाच खात्रीशिर मार्ग सर्वत्र अवलंबला जात आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रसार माध्यमातून याविषयी जागृती केली जात आहे.

करोना आजारावर निश्चित औषधी उपलब्ध नसल्याने होमिओपॅॅथिक होमिओपॅथिक औषधोपचार पद्धती साहाय्यक उपचारपद्धती म्हणून उपयुक्त ठरत आहे. होमिओपॅथिक केंद्रीय संशोधन परिषद यांनी सुचवल्याप्रमाणे आपल्या देशात कोविड-19 आजारासाठी औषध आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

होमिओपॅथिक औषध आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. आपल्या तसेच इतर देशांमध्येही या औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहेे.

मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलतर्र्फे मे महिन्यामध्ये मालेगाव शहरात साधारणपणे पाच लाख लोकांमध्ये होमिओपॅथिक औषधी वितरित करण्यात आले.

त्यानंतर आजाराचे स्वरूप मृत्युदर आणि डबलीग दर निश्चितच कमी झाल्याचे दिसून आले होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीचा उपयोग यापूर्वीही एपिदेमिक आणि पंडेमिक म्हणजे अशा साथींच्या आजारात होत आला आहे.

कॉलरा होपिंग कप, स्कार्लेटइना, प्लेग, कावीळ अशा साथ आजारांसाठी उपयुक्त ठरली आहे. आजही हे औषधे मानवाच्या आरोग्यासाठी आणि जीवनासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे.

मालेगाव आणि मुंबई यांसारख्या शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता असताना सेवाभावी संस्थांनी वाटलेले आर्सेनिक अल्बम 30 या औषधामुळे मोठ्या प्रमाणात आजार कमी झाला आहे.

त्या अनुषंगाने होमिओपॅथिक शास्त्रासंबंधी माहिती घेणे उचित ठरणार आहे. होमिओपॅथी निसर्ग नियमांवर आधारित वैद्यकीय शास्त्र आहे. सिमिलिया सिमीलीबस क्यूरेंटर तत्त्वावर आधारित आहे म्हणजेच सम:समं शमयती सोप्या भाषेत सांगायचं तर काट्याने काटा काढणे होय.

होमिओपॅथिक औषध निरोगी माणसामध्ये आजाराचे लक्षण निर्माण करतात व त्याच सारखे आजाराचे लक्षण असणार्‍या रोग्याला हेच औषध बरे करू शकते. या शास्त्राचा शोध डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी आपल्वर तीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रयोगानंतर लावला.

या शास्त्राचा प्रचार जर्मनी पासून विविध देशांमध्ये म्हणजे इंग्लंड ऑस्ट्रिया हंगेरी इटली इत्यादी ठिकाणी झाला. भारतामध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटिश या उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला.

राजा रणजीत सिंग यांच्यावर जर्मन होमिओपॅथिक डॉक्टर हॉनीगबर्गर यांनी होमिओपॅथिक उपचार केले. 1851 साली होमिओपॅथीक रुग्णालय व मोफत दवाखाना कोलकत्ता येथे चालू करण्यात आला.

पश्चिम बंगालमध्ये होमिओपॅथी मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय आणि राजश्रीयामुळे आजारनिवारणासाठी प्रभावी ठरली आणि रुजत गेली.

साथीच्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेसाठी पहिला होमिओपॅथिक दवाखाना कोल्हापूरात सुरू केला. भारत सरकारने सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीची स्थापना दिल्ली येथे केली.

भारतामध्ये होमिओपॅथिक महाविद्यालयांनी अनेक नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर्स घडवले स्वास्थरक्षणासाठी असणार्‍या होमिओपॅथिक प्रणालीचा विकास व वाढ भारत सरकारच्या आयुष मंत्रालय द्वारा करण्यात येत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोण तंत्रज्ञानाचा वापर करून हे शास्त्र प्रगत होत आहे. निश्चितच होमिओपॅथिक शास्त्र या आजाराला हरवण्यासाठी मोठी गुरुकिल्ली ठरत आहे. भारतासह सर्व विश्वातील नागरिकांचे आरोग्य निरामय राहो ही प्रार्थना व्यक्त करतो.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेतॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

प्राचार्य डॉ. फारुख एस. मोतीवाला,मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com