आता जिल्ह्यात घरपोच मद्यविक्रीस परवानगी

रेस्टॉरन्टमध्ये बाहेरील व्यक्तींना मनाई
आता जिल्ह्यात घरपोच मद्यविक्रीस परवानगी
USER

नाशिक । Nashik

30 एप्रिलपर्यंत मद्याची दुकाने पुर्ण बंद ठेवण्यास सवलत देत राज्य उत्पादन शुल्क विभगाने आता जिल्ह्यात घरपोच मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच रेस्टॉरन्टमध्ये गेस्ट असणारांना सेवा दिली जाणार आहे.

मात्र बाहेरी व्यक्तींना तेथे प्रवेश दिला जाणार नाही.मद्यसेवन परवाना असलेल्यांना मद्य खरेदी करता येणार आहे. मात्र यासाठी कर्मचार्‍यांना लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यानुसार 30 एप्रिल पर्यंत मद्यविक्री बंद आहे. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयातील सर्व रेस्टॉरन्ट व बारला फक्त होमडिलीव्हरी सेवांना परवानगी दिली आहे तसेच तेथे कोणत्याही नागरीकांना प्रवेश निषेध असेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरीलप्रमाणे इतर रेस्टॉरन्ट आणि बारप्रमाणेच बंधने पाळली जातील.

मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व हॉटेल कर्मचा-यांना कोव्हीड लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. परवानाधारक विक्रेते सकाळी 7 ते 8 वाजे पर्यन्त मद्य सेवन परवानाधारक ग्राहकांना मद्य पुरवठा करू शकतील. घरपोहोच सेवेतील सर्व कर्मचा-यांना लसीकरण करणे बंधनकारक असून ज्या ठिकाणी घरपोच सेवा द्यावयाची आहे.

त्या घर किंवा इमारतीच्या प्रवेशाद्वारापर्यन्त सेवा पुरविण्यासाठी प्रवेश असेल. वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मद्यविक्रेत्यावर 10 हजार रुपयांचं दंड करण्यात येईल तर वारंवार उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com