लाईट बिल
लाईट बिल |digi
नाशिक

दिंडोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे वीज बिलांची होळी

वीज बिल माफ न केल्यास जनतेत उद्रेक होईल - प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

लॉकडाऊन काळातील 3 महिन्याचे घरगुती वीज बिल हे वीज कंपन्यांनी महाराष्ट्रभर वाढीव दराने ग्राहकांना दिले.करोनामुळे शेतकरी , कामगार , व्यावसायिक , मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यात वाढीव बिल देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळलय . म्हणून या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

आज देशातली सर्वसामान्य जनता करोनाने पिचली आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी , खत औषधांची टंचाई, भाव वाढ, बोगस बियाणं, बेरोजगारी या समस्या उभ्या ठाकल्यात .त्यात वाढीव वीज बिल देऊन ग्राहकांच्या नरड्यावर पाय देण्याचे कामच वीज कंपन्यांनी केलं.आज जनतेला आधार देण्याची गरज असताना पेट्रोल डिझेलच्या रूपानं केंद्र शासन व वीज बिलांच्या रूपाने राज्य शासन यांच्यात जनतेची लूट करण्याची टांगा शर्यत सुरू आहे की काय? असा प्रश्न पडतो.जनतेच्या या विरोधात तीव्र भावना आहे.म्हणून दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तीन महिन्याचे वीज बिल शासनाने माफ करावे.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पणे रस्त्यावर उतरले,असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी यावेळी दिला.

माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेची परिस्थिती लक्षात घेता वीज बिल माफीची मागणी योग्य आहे व आपल्या शासनाने ती मान्य करावी असे मत व्यक्त केले. प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे , सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताई देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात दिलीपराव जाधव,वसंतराव थेटे, योगेश बर्डे, योगेश तिडके,वसंतराव कावळे,सुखदेव खुर्दळ,गणेश हिरे,राकेश शिंदे,संतोष गायकवाड,खंडेराव संधान ,अजित कड,कचरू पाटील जाधव,संपत जाधव , अभय सूर्यवंशी , सचिन कड ,रावसाहेब पाटील या विविध पक्ष , संघटना,संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दत्ता सोनवणे, किरण पाटील, नारायण संधान,शंकर फुगट, संजय आप्पा थोरात,योगेश संधान,अजय पाटील,प्रभाकर मोरे,जयराम फुगट, दत्ता झेंडफळे,संतोष संधान,रामनाथ फुगट, आनंदा वाघ,गोरख लभडे, विश्वास संधान , वैभव जगताप,सतीश सोनवणे ,सचिन लभडे यांच्या सह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आज महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.करोनाच्या बिकट परिस्थितीत कंपन्यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिल देऊन सामान्य जनतेच्या नरड्यावर पाय दिलाय. म्हणून दिल्ली सरकारप्रमाणे तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे. वीज बिलांची दरवाढ सुद्धा मागे घ्यावी.ही आमची प्रमुख मागणी आहे.

- संदीप जगताप , प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Deshdoot
www.deshdoot.com