अवकाळीचा तडाखा, पाच दिवसांत हजारो हेक्टरचे नुकसान

अवकाळीचा तडाखा, पाच दिवसांत हजारो हेक्टरचे नुकसान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हयात दि.१५ ते १९ मार्च अशा पाच - सहा दिवसांत जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस (unseasonal rain), गारपीटीने (hail) ८०७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (crop damage) झाले आहे.

४३७ गावांना अवकाळीचा तडाखा बसल्याने २१ हजार ७५० शेतकऱ्यांचे (farmers) आर्थिक नुकसान (financial loss) झाले आहे. जिल्हा प्रशासन (District Administration) आणि कृषी सहाय्यकांच्या मदतीने पंचनाम्याचा (panchanama) अहवाल प्रशासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यात ढगाळ हवामानासह (cloudy weather) अवकाळी पाऊस (unseasonal rain) अधूनमधून होत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हयात १५ ते १९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. काही भागात गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकांना (rabbi crop) चांगलाच फटका बसला असून अनेक भागात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

जिल्हयात पेठसह नांदगाव (nandgaon), नाशिक (nashik), सुरगाणा (surgana), कळवण (kalwan), भागात गारपीटिने तडाखा दिला. ढगाळ वातावरणाने द्राक्षबागांवर गारांच्या तडाख्याने तडे गेले आहेत. कांदा, गहु, द्राक्ष आंबा आदी पिके भुईसपाट झाली आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार पेठ, नांदगाव, निफाडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतातील पिकांच्या सर्‍यांमध्ये गारांचा खच पडल्याचे पाहावयास मिळाले.

गेल्या दोन आठवडयांपासून जिल्हयात अवकाळीचा तडाख बसत असून आधीच शेतमालाला भाव नाही त्यात आस्मानी संकट यामुळे शेतकरयांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. अद्याप याच नुकसानीचे पंचनामे होत नाही तोच २४ मार्चपासून पुन्हा अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावला आहे. जिल्हयात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून ३५५६ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान (crop damage) झाले तर १५९५ हेक्टरवरील गहु पिकाचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय नुकसान

तालुका नुकसान (हेक्टर)

 • नांदगाव २४४३.१०

 • कळवण ८३२.३०

 • देवळा २४४.५०

 • दिंडोरी ४२

 • नाशिक ३८.६०

 • त्रयंबकेश्वर ४०.२५

 • पेठ १५८१.७६

 • इगतपुरी ८७

 • निफाड १५१४.५०

 • सिन्नर ८.५०

 • चांदवड ५०५

 • येवला ५०१.५०

 • एकूण ८०७९.१५

पिकनिहाय झालेले नुकसान

पिके नुकसान (हे.)

 • कांदा ३५५६.८६

 • गहु १५९५.७२

 • भाजीपाला ४३६.२०

 • द्राक्षे ७८२.६७

 • आंबा १०३४.३०

 • डाळींब ३५

 • कांदा रोपे ५१०

 • टोमॅटो १४

 • हरभरा ७५

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com