प्रशिक्षणार्थी कामगारांना कामावर घ्या; ‘बॉश’ला उच्च न्यायालयाचे आदेश

प्रशिक्षणार्थी कामगारांना कामावर घ्या; ‘बॉश’ला उच्च न्यायालयाचे आदेश

सातपूर । प्रतिनिधी | Satpur

नाशिक औद्योगिक न्यायालयाचे (Nashik Industrial Court) आदेश ‘जैसे थे’ ठेवत उच्च न्यायालयाने (High Court) बॉश कंपनीची (Bosch Company) याचिका फेटाळली असल्याच्या आदेशाची प्रत प्रवेश बंदी केलेल्या प्रशिक्षणार्थी (ओजेटी) कामगारांना (Apprentice workers) बुधवारी (दि. 25) प्राप्त झाली.

20 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीने ऐन दिवाळीच्या तोंडावर 711 कामगारांना कामावर येण्यास व आवारात प्रवेश बंदी करण्यात आली होती. 485 कामगारांनी औद्योगिक न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला होता. बॉश कंपनीच्या (Bosch Company) कमी केलेल्या या कामगारांना कामावर घ्या, नाहीतर पगार द्या, असा आदेश फेब्रुवारी 2022 मध्ये नाशिकच्या औद्योगिक न्यायालयाने (Nashik Industrial Court) दिला होता.

मात्र कंपनीने औद्योगक न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. या निकालाबद्दल दाद मागण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाशिक औद्योगिक न्यायालयाचा आदेश जैसे थे ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे. बॉश कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दोन्ही याचिका फेटाळल्याचे दिसून येते आहे.

याबाबत कामगारांचे वकील अ‍ॅड. टी. के. प्रभाकर यांच्यानुसार उच्च न्यायालयाचा हा आदेश अपलोड झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी कंपनीला पंधरा दिवस मिळणार आहेत. यामुळे आता कंपनी प्रशासनाकडून उच्च न्यायालयाचा सन्मान ठेवून कामगारांना परत कामावर घेतले जाते की, आदेशाला पुन्हा आव्हान दिले जाते, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com