अवकाळीने झालेल्या नुकसानीची कैफियत थोरातांकडे मांडणार

अवकाळीने झालेल्या नुकसानीची कैफियत थोरातांकडे मांडणार

आहुर्ली | प्रतिनिधी | Ahurli

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे इगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी थोरातांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे (Rain) झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्याकडे कैफियत मांडणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करु, अशी ग्वाही आ. हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी दिली आहे...

महसूलमंत्री थोरात यांच्या दौर्याच्या पाश्वर्भुमीवर भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या उपस्थित राहून नुकसानीची माहिती, पिकविमा वा अन्य शेतीविषयक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आ. हिरामण खोसकर यांनी केले आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी हे सरकार राहिल, असा दावाही आ.खोसकर यांनी बोलताना केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com