महामार्गाची चाळण; अपघाताचे प्रमाण वाढले

महामार्गाची चाळण; अपघाताचे प्रमाण वाढले

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील नांदूरशिंगोटे (Nandoorshingote) गावातून जाणार्‍या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर (Old Nashik-Pune highway) जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.

निमोण नाका परिसरात झालेल्या दूरवस्थेमुळे मागील काही दिवसांत अनेक दुचाकीधारकांचे अपघात (accidents) झाल्याचे नागरिक सांगत आहेत. संबंधित विभागाने रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे. नाशिक (nashik) - पुणे (pune) हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway) पूर्वी नांदूरशिंगोटे गावातून जात होता.

मात्र, गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने बाह्यवळण रस्ता गावाच्या बाहेरुन गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली असली तरी परिसराला जोडणारा रस्ता गावातून जात आहे. गावातून जाणार्‍या महामार्गावरील निमोण नाका, सिन्नर (sinnar) व संगमनेरकडे (Sangamner) जाणारा मुख्य रस्ता, चास नाका, निमोण रोड आदी ठिकाणी सर्वत्र खड्डेच खड्डे (potholes) झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने अनेकदा रात्रीच्या वेळेस खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीवरुन घसरण्याचे प्रकार घडले आहेत.

रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गावात शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँका असल्याने परिसरातील 8-10 गावांतील नागरिकांचा राबता नांदूरमध्ये असतो. त्यामुळे पायी चालणार्‍या नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांतून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

जोरदार पावसाचा फटका

नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज पंधरा ते वीस गावांचा खरेदी-विक्रीसाठी संपर्क येतो. तसेच संगमनेर, अकोला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर, पुणे भागात जाण्यासाठी येथून पर्यायी व्यवस्था असल्याने नेहमीच दळणवळणही अधिक असते. त्यात जोरदार पावसाने या भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. खड्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे.

रस्ता नेमका कोणत्या खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे हे कळत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही यासाठी कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. नागरिकांसह वाहनधारकांची अडचण वाढतच आहे. लोकप्रतिनिधींकडून याकडे द ुर्लक्ष होत असल्याने दाद कुणाकडे मागायची?

- किशोर शेळके, नागरिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com