लासलगावात आमदार निधीतून हायमास्टचे

लासलगावात आमदार निधीतून हायमास्टचे

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगावसह (Lasalgaon) टाकळी विंचूर परिसरातील रस्त्यांसाठी आमदार नरेंद्र दराडे (MLA Narendra Darade) यांचे निधीतून 19 हायमास्टचे लोकार्पण मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव कुणाल दराडे यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले.

आ. दराडे यांचे निधीतून लासलगाव येथे 17 तर टाकळी परिसरात 2 असे 19 हायमास्टचे लोकार्पण (Dedication of the Highmast) करण्यात आले. हे हायमास्ट बालाजी मंदिर, श्रीराम नगर, लासलगाव पोलीस ठाणे, बाजारतळ, मुस्मिल स्मशानभूमी, महादेव मंदिर, बाबा अमरनाथ मंदिर, जैन स्थानक, सह्याद्री चौक, गणेश मंदिर, राधानगर, महावीर विद्यालय, सुमन नगर, दत्तमंदिर, गोविंद संकूल, गोविंद नगर, टाकळी येथील शिंदे वस्ती व सरस्वती नगर येथे बसविण्यात आले आहे.

या हायमास्ट लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नामको बँक उपाध्यक्ष प्रकाश दायमा (Named Bank Vice President Prakash Dayama), जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य डी.के. जगताप (Zilla Parishad Standing Committee Member D.K. Jagtap), मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा लासलगाव सरपंच जयदत्त होळकर (Jaydatta Holkar, Director, Mumbai Agricultural Produce Market Committee and Lasalgaon Sarpanch) , बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, पं.स. सदस्य शिवा सुरासे यांचेसह महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड

ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, अमोल थोरे, गुणवंत होळकर, योगेश पाटील, विशाल पालवे, डॉ.विलास कांगणे, डॉ.सुजित गुंजाळ, डॉ.कैलास पाटील, डॉ.विकास चांदर, निलेश लचके, प्रवीण कांगणे, अ‍ॅड. उत्तम नागरे, किशोर व्यास, संतोष डागा, डॉ.संगिता सुरसे, मोहन दायमा, विजय रावळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com