नासाका ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव : खा. गोडसे

नासाका ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव : खा. गोडसे

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (Nashik Cooperative Sugar Factory) आगामी गळीत हंगामात 3.50 लाख मे टन ऊस (sugar cane) गळपाचे उद्दिष्ट असून सन 2023- 24 गळीत हंगामापासून कारखाना 3500 मे टन गाळप क्षमतेने चालविण्याबरोबरच आसवानीसह इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) उभा केला जाणार आहे.

त्यामुळे आगामी काळात शेतकर्‍यांना (farmers) अधिकचा देण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन खा. हेमंत गोडसे (Chairman MP Hemant Godse) यांनी केले. तब्बल नऊ वर्ष बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory) मे. दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स (Deepak Builder & Developers) यांचे माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. आगामी 2022- 23 गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजनप्रसंगी खा. गोडसे बोलत होते.

व्यासपीठावर संचालक दीपक चंदे (Director Deepak Chande), सागर गोडसे, शहेजाद पटेल, कार्यकारी संचालक एस. के. शेटे, सरपंच सुरेखा गायधनी, दिलीप गायधनी, बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले, बाळासाहेब बरकले, रमेश आवटे, अशोक खालकर, संजय तुंगार, तानाजी गायधनी, नवनाथ गायधनी, तानाजी करंजकर, रत्नाकर गायकवाड, विष्णुपंत गायखे, विलास धुर्जड, गिरीश धुर्जड, सोमनाथ खातळे, नारायण मुठाळ, विलास गायधनी, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. गोडसे यांनी चाचणी गणित हंगामात निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करून पुढील हंगामाची प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. याशिवाय आगामी हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण (Factory expansion) आसवानीसह, इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) सुरू करीत आहोत, त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी (farmers), कामगार यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ देण्याचा आपला प्रयत्न आहे.

यावेळी बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले, रमेश आवटे यांनी देखील परिसराच्या विकासाचे केंद्र असलेला नाशिक कारखाना चांगल्या प्रकारे चालणे आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी ऊस तोडणी ठेकेदार राजेंद्र राठोड, भरत वाघ व सोमनाथ परदेशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सागर गोडसे यांच्या हस्ते विधिवत मिल रोलरची पूजा करण्यात आली.

सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे, रवींद्र मालुंजकर तर आभार व ऊस विकास अधिकारी अरुण पाटील यांनी केले. कार्यक्रमास विलास आडके, विष्णुपंत गोडसे, नामदेव बोराडे, बबनराव कांगणे, ग्राप सदस्य ताराबाई गायधनी, प्रिया गायधनी, कमल गायधनी, रत्ना पगार, सोनाली चारस्कर, शिवाजी मस्के, मधुकर सातपुते आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com