नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासूच्या शिष्टमंडळाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने दिल्लीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सहसचिव डॉ. सुरेंदर सिंग आणि डॉ. गोपू कुमार यांची भेट घेऊन उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’ अंतर्भाव करावा तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी रद्द होणार आहे.

त्या जागी उच्च शिक्षण आयोग येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक विद्यापीठांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते अशी चिंता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) कडून व्यक्त केली.

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीतदेखील आमूलाग्र सुधारणा व्हावी आणि ती कशी करता येईल या उद्देशाने युनियनचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारींसह ६ दिवसीय दिल्ली शैक्षणिक दौरा पूर्ण केला.

मासूने सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील मेहमूद प्रचा आणि अॅड. मोहिनी प्रिया यांची भेट घेऊन, महाराष्ट्रातील शैक्षणिक लढा सर्वोच्च न्यायालयात लढण्याचे नियोजन केले. गाझीपूर सीमेवर किसान आंदोलनात सहभागी होत, कायदेशीर बाबींसाठी मासू किसान आंदोलनाला सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

दोऱ्यात मुख्यता: दिल्लीतील शासकीय शाळांना भेट देऊन, दिल्ली सरकारने अल्पकाळातच कशा प्रकारे सरकारी शाळांचा कायापालट केला आहे. वाढलेला शैक्षणिक दर्जा अस बरच काही समजून घेऊन सर्व समावेशक मॉडेल घेऊन महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत कसा बदल करता येईल याचा प्रोजेक्ट काही दिवसात मासू महाराष्ट्र सरकारला सादर करणार आहे.

शिक्षण दोऱ्यातील संस्थापक अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे, उपाध्यक्ष अॅड. सुनील देवरे, सचिव प्रशांत जाधव, राज्य संघटक अरुण चव्हाण, मीडिया समन्वयक सिद्धार्थ तेजाळे, अॅड. स्नेहल निकाळे, परेश चौधरी, भिवंडी तालुका अध्यक्ष-अॅड. करिष्मा अन्सारी, मधू आठवले, आकाश वळवी आणि शिक्षक विंगचे समन्वयक प्रा. नितीन घोपे यांचा समावेश हाेता.