नासाकासाठी साकडे; गोडसे यांची शरद पवारांशी चर्चा

नासाकासाठी साकडे; गोडसे यांची शरद पवारांशी चर्चा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nasaka) भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबत जिल्हा बँकेकडून होत असलेली टाळाटाळ लक्षात आल्याने खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत याबाबत माहिती देऊन कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने बँकेला आदेशित करण्याची मागणी केली...

बंद पडलेले सहकारी साखर कारखाने भाडे तत्त्वावर सुरू करण्यासाठी खा. शरद पवार यांनी राज्यभरात पुढाकार घेतला असून त्याच माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील रानवड सहकारी साखर कारखाना आ. दिलीप बनकर (Dilip Bankar) यांच्या नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून काल सुरू करण्यात आला. लवकरच निफाड सहकारी साखर कारखाना आहे. अशा पद्धतीने सुरू करण्याचे आश्वासन खासदार पवार यांनी दिले.

त्याच धर्तीवर नाशिक येथे मुक्कामी असलेल्या पवार यांची काल सकाळी खा. गोडसे यांनी भेट घेत नाशिक सहकारी साखर कारखान्याची माहिती विशद केली. भाडेतत्त्वाची प्रक्रिया संपूर्णपणे पूर्ण झालेली असुन देखील जिल्हा बँकेकडून पुढील निर्णय घेतला जात नाहीत. साखर आयुक्त यांनी 28 ऑक्टोबर रोजी बँकेला लेखी आदेश देऊन निर्णय घेण्यास सांगितले आहे. परंतु बँक प्रशासन काहीच हालचाल करीत नाही.

त्यामुळे चार तालुक्यातील शेतकरी व कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे. गळीत हंगामाचा मोसम निघून गेल्यास यंदाचा हंगाम घेता येणार नाही, ही बाब खा. गोडसे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पवार यांनी नियमानुसार भाडे तत्त्वाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर बँकेने निर्णय का घेतला नाही, हा आपणास प्रश्न पडला आहे.

याबाबत आपण सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून चौकशी करून लवकरात लवकर कारखाना सुरू कसा होईल, याकडे लक्ष घालू असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यामुळे येत्या काही दिवसातच नासाकाचा बॉयलर पेटला जाऊ जाऊन बंद असलेलं नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकतो. तसेच त्या माध्यमातून परिसराला गतवैभव प्राप्त होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com