पूरग्रस्तांना मदतीचे हात

पूरग्रस्तांना मदतीचे हात

खोकरविहीर । वार्ताहर | Khokarvehir

सुरगाणा तालुक्यातील (surgana) अलंगून येथील तलावातील पाण्याचा प्रवाह जास्त आल्यामुळे गावाला पाण्याने वेढा दिला. या पाण्याच्या पुरामुळे गावातील काही घरांचे नुकसान झाले.

यामुळे कपडे, धान्य, जीवनाआवश्यक वस्तूचे नुकसान झाल्यामुळे सुरगाणा पं. स. च्या माजी सभापती मनीषा महाले यांनी जलपरिषद मित्र यांच्याकडे आवाहन केले. अशावेळी जलपरिषद (jal parishad) कडून विविध संस्थापर्यंत नुकसानग्रस्त गावाची माहिती दिल्यानंतर तुषार पिंगळे, सागर शेलार,

प्रसाद भांबरे, वृक्षवली फाऊंडेशन आदींनी गिव्ह संस्था (Give Institute), गिव्ह व्हेलफेअर ऑर्गनायझेसन संस्था नाशिक (Give Welfare Organization Nashik) या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश अय्यर यांच्या सहकार्यातून अलंगुन गावातील पूरग्रस्त परिवाराला वस्तू देण्यात आल्या.

बेडशीट- 110, ब्लँकेट -100, गोधडी -100, डेटॉल साबण -100, मूग डाळ 25 किलो, टी शर्ट - 10, प्लेट -25 आदी वस्तू देण्यात आल्या. गिव्ह व्हेलफेयर ऑर्गनायझेसन संस्था यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्या केल्या बद्दल अलंगुण ग्रामस्थांच्या वतीने जलपरिषद मित्र परिवार पेठ (peth), सुरगाणा (surgana), त्रंबकेश्वर (Trambakeshwar), दिंडोरी (dindori) यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार जे. पी.गावीत, तहसिलदार मुळीक, गटविकास अधिकारी दिपक पाटील, पोलिस निरीक्षक कोळी , गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, उपअभियंता भामरे, डॉ. रणवीर, सरपंच हेमंती भोये, वसंतराव बागुल, पांडुरंग भोये, पोलीस पाटील आनंदराव गावीत, तुषार पिंगळे, सागर शेलार, कृष्णा पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com