नाशिक l Nashik (प्रतिनिधी) :

नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या आदिवासी खो-खो प्रबोधिनीतील खेळाडूंना नाशिकरोड येथील पुरुषोत्तम मित्र फाउंडेशनने मदतीचा हात दिला. या खेळाडूच्या आहारासाठी ५० किलो तांदूळ, ३० किलो तूरडाळ, २८ किलो खजूर तसेच २ तेल डबे मदतीच्या स्वरूपात देण्यात आले.

या सर्व मुली शासकीय कन्या शाळेत शिकत आहे. सदर कार्यक्रम पुरुषोत्तम मित्र फाऊंडेशनच्या माध्यमातून छ. शिवाजी स्टेडियम येथील खो-खोच्या प्रशिक्षण केंद्रावर आयोजित करण्यात आला होता. हे विनामूल्य प्रशिक्षण केंद्र क्रीडाधिकारी कार्यालय नाशिक व नाशिक जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविले जात आहे.

या कार्यक्रमास पुरुषोत्तम मित्र फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणून पराग वैशंपायन, प्रकाश थोरात, चंद्रकांत उगले, मिलिंद गंभीर, दत्तात्रय आव्हाड, दत्तात्रय दंडगव्हाळ, उमेश गायधनी तसेच नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव उमेश आटवणे, सहसचिव दत्ता गुंजाळ, गीतांजली सावळे व मंदार देशमुख हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो-खो संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सचिन निरंतर यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुरुषोत्तम मित्र फाउंडेशनचे उपक्रम

देवबंद येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य वाटप, ४० सोलापुरी चादरी वाटप, तसेच दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला आहे. दहावीतील यशस्वी ४० विद्यार्थ्यांना कॉलेज सॅकचे वाटप करण्यात आले आहे.

अशोकस्तंभ येथील अनाथ आश्रमासाठी सलग दोन वर्ष किराणा सामान, बिस्किटे तसेच थंडीचे उबदार पांघरूण वाटप करण्यात आले आहे. शालेय जीवनातील मित्र जो सध्या मनोरुग्ण आहे. त्याला कायम स्वरूपी सांभाळण्याची जबाबदारी घेऊन दरमहा दहा हजार रुपयाची आर्थिक मदत करत आहेत.

सदस्यांच्या घरातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुले व महिला यांचा नियमित सत्कार करण्यात येतो. गरीब २४ विद्यार्थ्यांची पुढील ६ वर्षे शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांना गड व दुर्ग याची माहिती मिळावी या करीत दुर्ग मित्र अमोल जमदरे याच्या कडून माहिती सादरीकरण केले जाते. तसेच सांगली येथे आलेल्या पुरग्रस्थांसाठी धान्य स्वरूपाची मदत पाठवली आहे.