पंचायत समिती, सिन्नर
पंचायत समिती, सिन्नर
नाशिक

सिन्नर : तेजश्रीच्या कुटूंबाला ७५ हजारांची मदत

शाळेच्या आवारात खेळताना अपघात होऊन झाला होता मृत्यू

Vilas Patil

Vilas Patil

विंचूरदळवी । Vinchurdalvi

पांढुर्ली येथील जनता विद्यालयाच्या आवारात खेळतांना अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्या तेजश्री शेळके या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत 75 हजारांचा धनादेश नुकताच पंचायत समितीच्या सभापतींसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

इयत्ता 6 वीत शिकणारी तेजश्रीचा मृत्यु झाल्यानंतर शेळके कुटुंबियांनी दु:ख पचवत तेजश्रीचे सर्व अवयव नाशिक येथील हॉंस्पीटलला दान केले होते. यानंतर सदर कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्रप्रमुख कैलास शेळके, मुख्याध्यापक वैशाली उकिर्डे, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, तालुकाध्यक्ष संजय भोर,गोरक्ष सोनवणे यांनी तात्काळ राजीव गांधी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला सादर केला होता. पंचायत समितीने हा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठवला होता.

हा प्रस्ताव मंजूर झाला असून 75 हजारांचा धनादेश पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या हस्ते तेजश्रीची आई ज्योती शेळके यांच्याकडे नुकताच सूपूर्द करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे सदस्य सदस्य तातु जगताप, रवी पगार, वेनुताई डावरे, संगिता पावसे,गटविकास अधिकारी लता गायकवाड , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com