
देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी आपल्या नियोजित वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून चिपळूण येथे आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्नधान्य, घरगुती साहित्य व वैद्यकीय मदत पाठवण्याचा निर्णय घेतला. 4 ट्रकच्या माध्यमातून 45 टन साहित्य पाठविण्यात आले.
यानिमित संसरी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामकृष्णदास लहवितकर होते त्यांनी खा.गोडसे याना संत तुकाराम गाथा हा ग्रंथ भेट दिला.
व्यासपीठावर शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी महापौर व माजी आमदार वसंत गिते, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, विनायक पांडे, जगन आगळे, डॉ. मंगेश सोनवणे, राजू लवटे, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, केशव पोरजे, रमेश धोंगडे, जयश्री खजूल, अरुण जाधव, उत्तम कोठुळे, राहुल ताजनपुरे, प्रवीण पाळदे, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, योगेश गाडेकर आदी होते.
यावेळी लहवितकर महाराज यांनी खा.गोडसेंच्या कामाचा गौरव केला. सूत्रसंचालन सुधाकर गोडसे, आभार चंद्रकांत गोडसे यांनी मानले. कार्यक्रमास सरपंच विनोद गोडसे, माजी सरपंच युवराज गोडसे, अनिल गोडसे, डॉ शिवराम गोडसे, संतोष कोकणे, रमेश गिते, शेखर गोडसे, तानाजी गोडसे, रामकृष्ण गोडसे, दत्ता सुजगुरे, रमेश गायकर, विलास आडके, शिवाजी मोराडे, संजय भालेराव, सुरेश कदम, विलास संगमनेरे, बबन काडेकर, विष्णुपंत गोडसे आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.