नाशकात उद्यापासून हेल्मेटसक्ती; दुचाकीस्वारांना वापरावे लागणार हेल्मेट

नाशकात उद्यापासून हेल्मेटसक्ती; दुचाकीस्वारांना वापरावे लागणार हेल्मेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्यापासून नाशिक शहरात आयुक्तालयाच्या हद्दीत हेल्मेट सक्तीचा (Helmet Compulsory) नियम अधिकच तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील महत्वाचे चौक, सिग्नल, वाहतूक पॉईंटवर आता तपासणी सुरु होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सिताराम गायकवाड (Sitaram Gaikwad) यांनी परिपत्रकात दिली...

पोलीस आयुक्त दिपक पांडेय (Deepak Pandey) यांनी नाशिक शहरात दुचाकी अपघातात (Accident) दुचाकी स्वारांचा मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला.

त्याअनुषंगाने विनाहेल्मेट दुचाकी स्वारांचे समुपदेशन (Counseling), नो हेल्मेट नो पेट्रोल (No Helmet No Petrol), नो हेल्मेट नो कॉपरेशन (No helmet no cooperation), त्यानंतर दंडात्मक कारवाई अशा मोहीम राबविल्या.

त्यांअतर्गत ९ सप्टेंबर २०२१ ते ३० नोहेंबर २०२१ पर्यंत ५ हजार ४५६ पुरुष व ४७६ महिला असे ५ हजार ९३२ विनाहेल्मेट दुचाकी स्वारांचे नाशिक फस्ट येथे समुपदेशन करण्यात आले.

नाशिक शहरात १२ ठिकाणी समुपदेशन केंद्र उभारून आतापर्यंत ४७ हजार २९९ विनाहेल्मेट दुचाकी स्वारांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच १८ जानेवारी २०२२ ते आतापर्यंत १४ हजार ११६ विनाहेल्मेट दुचाकी स्वारांवर ७५ लाख ८३ हजार ५०० रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आता उद्या (दि.२) पासून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी स्वारांना चालकासह मागे बसणाऱ्याला देखील हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून दुचाकीस्वारांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करावा. आपला वेळ व आर्थिक झळ सोसण्यापासून वाचावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केले आहे.

सहा महिन्यांत इतक्या दुचाकीस्वारांचे मृत्यू

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत दुचाकी स्वारांचे ५९ अपघात झाले. त्या अपघातांत ५४ पुरुष व ८ महिला असे ६२ दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले. त्यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालवल्यामुळे ४८ पुरुष व ८ महिला अशा ५६ जणांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.