विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍यांनो सावधान
file photo

विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍यांनो सावधान

नववर्षात सक्त कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या नाशिक शहरामध्ये (nashik city) दुचाकीस्वारांनी हेल्मेट (helmet) वापरावे याकरिता पोलीस प्रशासनातर्फे (Police administration) समुपदेशन (Counseling) करण्यात येत आहे. मात्र नवीन वर्षात (new year) हेल्मेट वापराचे नियम (Helmet usage rules) आता सक्त करण्यात येत असून दंडात्मक कारवाईसह (Punitive action) वाहन परवाना (Vehicle license) देखील रद्द करण्याची तरतूद करण्यात येत असल्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आता बंधनकारक होणार आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी नाशिक शहरात दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्याकरीता सक्ती करत विविध उपक्रम राबविले. आत्तापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ('No helmet no petrol') व त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे दोन तास समुपदेशन करणे ही मोहीम राबवली. 1 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत 7385 विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले.तसेच 15 ऑगस्ट 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 24 पुरुष व 5 महिला दुचाकीस्वार विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याने दुचाकी चालवितांना विनाहेल्मेट कारवाई ही अधिकच सक्त करण्यात येत आहे.

त्यानुसार जे कोणी वाहनधारक विना हेल्मेट 18 जानेवारी 2022 पासून दिसतील त्यांना समुपदेशनाची कार्यशाळा तर करावीच लागेल मात्र त्यासोबत ई चलान कार्यप्रणाली (E-invoice operation) अंतर्गत मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार (Motor Vehicle Act) पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच तोच व्यक्ती दुसर्‍यांदा विनाहेल्मेट आढळून आल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच जोपर्यंत विना हेल्मेट धारक दंड भरत नाही तोपर्यंत त्याचे वाहन पोलिसांच्याच ताब्यात राहील व दंड भरल्यानंतरच त्याचे वाहन त्याला ताब्यात देण्यात येईल असा नवीन अध्यादेश जाहीर करण्यात आला असून ही कारवाई नाशिक शहरातील वेगवेगळ्या परिसरात दररोज करण्यात येणार आहे. तरी सर्व दुचाकी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे व दुचाकी चालवतांना हेल्मेटचा आपल्या स्वतःच्या सुरक्षितते करीता वापर करावा व समुपदेशनासाठी खर्च होणारा आपला वेळ वाचावावा असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे शहर वाहतूक विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com