नाशिकची हेल्मेट चळवळ देशभर गाजणार

नाशिकची हेल्मेट चळवळ देशभर गाजणार

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

सेवाभावी संस्थांनी फुकट हेल्मेट (Helmet) वाटू नका, वाटायच असेल तर हेल्मेट घातलेल्या लोकांना पुष्पगुच्छ द्या, असे मत पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी व्यक्त केले. नवीन नाशकातील माऊली लॉन्स (Mauli Lawns) परिसरातील साई पेट्रोलियम (Sai Petroleum) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते....

यावेळी उपायुक्त विजय खरात, गुन्हे उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त समीर शेख, नवलनाथ तांबे, सिताराम गायकवाड, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, साई पेट्रोलियम चे संचालक कुणाल गोसावी, प्रसाद गोसावी, उद्योजक शरद फडोळ,राजेंद्र फड, भाऊसाहेब महाले, अमोल शेळके आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्तांनी 15 ऑगस्टपासून "नो हेल्मेट नो पेट्रोल" (No Helmet No Petrol) ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली त्यानुसार पेट्रोलपंप मालकांनी त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या पेट्रोल पंप मालक व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी साई पेट्रोलियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परिसरातील इतर पेट्रोल पंपाचे मालक तसेच व्यवस्थापक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी वार्तालाप करताना पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आपण नाशिककर फार भाग्यवान आहोत. येत्या काळामध्ये संपूर्ण देशाला या हेल्मेटच्या चळवळीच्या माध्यमातून नवीन संदेश देऊन देशभरात नाशिकचे नाव उज्वल होणार आहे.

यापूर्वी बऱ्याच शहरांमध्ये असा प्रकल्प राबविण्यात आला मात्र त्यास यश मिळाले नाही. मात्र नाशिकमध्ये नो हेल्मेट नो पेट्रोल हा उपक्रम राबविल्यानंतर अवघ्या तीन दिवसात 10 टक्के हेल्मेट वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये 50 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे व येत्या काही दिवसातच संपूर्ण नाशिककर हेल्मेट वापरून संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण करतील त्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

बुधवार (दि.18) रोजी म्हसरूळ येथे काही युवकांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर मी स्वतः तेथे जाऊन पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचे व मालकांचे मनोधैर्य वाढल्याने चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त पांडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com