एचएएल मधील मयत सेवकांच्या वारसांना दिलासा

दरमहा मिळणार आर्थिक सहहाय
एचएएल मधील मयत सेवकांच्या वारसांना दिलासा
USER

ओझर | Ozar

अकाली निधन झालेल्या एचएएल कामगारांच्या (HAL Workers) वारसास मृत सेवकांच्या अवलंबितांसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत कामगाराच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत (Worker retirement age) दरमहा आर्थिक सहाय्य (Monthaly Financial assistance) मिळणार असल्याचे एचएएल समन्वय समितीचे प्रवक्ते व कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसेे (Sachin Dhomse) यांनी म्हटले आहे.

ढोमसे म्हणाले की, करोना महामारीच्या (Corina Crisis) काळात एचएएल कामगार बांधवाचा मृत्यू झाला आहे.

अकाली मृत होणार्‍या कामगारांच्या कुटुंबियांची परिस्थिती विचारात घेता त्यांच्या कुटुंबियातील वारसास नोकरी द्यावी किंवा आर्थिक मदत म्हणून दरमहा रक्कम देणारी योजना द्यावी अशी मागणी एचएएल कामगार संघटनेकडून (HAL Workers Union) करण्यात आली होती. एचएएल कामगार संघटनांच्या या मागणीला यश आले असून ‘एचएएल कुटुंब’ ही भावना डोळ्यापुढे ठेवत ऐतिहासिक अशी योजना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

1 जानेवारी 2020 नंतर आत्महत्या वगळता कुठल्याही कारणाने मृत होणार्‍या कामगार, अधिकारी बांधवाच्या वारसास पती, पत्नी किंवा सहचारी मृत असतील तर 21 वर्षाखालील मुलगा, अविवाहित 25 वर्षाखालील मुलगी यांना दरमहा 15 ते 20 हजार रुपये त्यांच्या वेतनश्रेणीनुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

ही मदत मृत कामगारांच्या अवलंबितांसाठी आर्थिक सहाय्य योजना (Fianancial Assistance Scheme) या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार असल्याचे परिपत्रक उच्च व्यवस्थापनाने लागू केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com