त्र्यंबक तालुक्यात ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा

परिसरात नेटवर्कही 'जॅम'
त्र्यंबक तालुक्यात ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा

नाशिक | Nashik

तौक्ते वादळाचा नाशिक शहरासह तालुक्यात जाणवत असून सकाळपासून ढगाळ वातावरणात सह वारे वाहू लागले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधारा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व गुजरात राज्याच्या तटवर्ती भागाला त्याचा तडाखा बसू शकतो.

त्यामुळे आज सकाळपासून जिल्ह्यासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा वाहत आहे. उद्या (दि.१६) देखील सोमवारी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिक व गुजरात जिल्ह्याच्या सीमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com