Video : सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

सिन्नर | संतोष भोपी | Sinnar

तालुक्यात (Sinnar taluka) आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) वादळी वाऱ्यासह (Winds) अचानक हजेरी लावल्याने वावीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे...

Video : सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मोठी बातमी! नक्षलवाद्यांचा जवानांच्या ताफ्यावर हल्ला; ११ शहीद

याबाबत अधिक माहिती अशी की, वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील स्थानिक व्यवसायिकांचे व काही राहत्या घरांचे छप्पर उडाले. तर सिन्नर-शिर्डी महामार्गावरील उड्डाण पुलावर असलेले विजेचे खांब अस्ताव्यस्त झाल्याचे दिसत आहे. तसेच येथील लकी जुस सेंटर पूर्णपणे उध्वस्त झाले असून या सेंटरचे पत्रे जवळपास ५०० फूट लांब पडल्याचे दिसत आहे.

त्याचबरोबर येथील ग्रामस्थ सुनील काटे यांची दुकानाची टपरी ही वाऱ्याने जवळपास एक हजार फूट लांबीवर जाऊन अस्ताव्यस्त पडली आहे. तर वावी परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून हजार ते पाचशे फूट लांबीवर जाऊन पडलेले आहेत. तसेच पावसाबरोबर गारा देखील पडल्याने परिसरातील शेतकरी (Farmer) भयभीत झाले आहेत.

Video : सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
नाशकात बीएड सीईटीसंदर्भात गोंधळ; हॉल तिकीटावर तारीख आजची मात्र परीक्षा झाली काल!

यासोबतच काहींच्या घराचे पत्रे उडाल्याने सगळा संसार उघड्यावर आला आहे. तर रस्त्यावर (Road) व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com