त्र्यंबक तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, उन्हाचा कडाका वाढला

त्र्यंबक तालुक्यात पावसाचा जोर ओसरला, उन्हाचा कडाका वाढला

नाशिक | Nashik

त्र्यंबक शहरासह (Trimbak Taluka), तालुक्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे आता तालुक्याचे मुख्य पीक असणाऱ्या भाताच्या लागवडीला (Rice Crop) सर्वत्र अच्छे दिन आल्याचे चित्र दिसून येत आहे...

त्र्यंबक तालुक्यात अनेक दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. त्यातच दोन दिवस सलग जोरदार पाऊस झाला. यामुळे भात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर, हरसूल, वाघेरा, हिरडी पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील शेतीमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती स्थिती झाली होती. परंतु कालपासून परिसरात तापमानात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी व सर्व सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com