अतिवृष्टीमुळे टोमॅटो धोक्यात

अतिवृष्टीमुळे टोमॅटो धोक्यात

पांडाणे | वार्ताहर | Pandane

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) पांडाणे परिसरात पावसाने (Rain) नित्यानेच वक्रदृष्टी फिरविल्याने टोमॅटोचे (Tomato) पिक धोक्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे...

मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यासह संपूर्ण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांची चांगलीच दमछाक केली. पांडाणे, वणी, चंडीकापूर, मांदाणे, अहिवंतवाडी, जिरवाडे, अंबानेर, सागपाडा, पुणेगाव, कोशिंबे, माळेदुमाला, पिंप्री अंचला, खोरीपाडा, चौसाळे, करंजरखेड आदी गावात टोमॅटो पिक हे मोठया प्रमाणात केले जातात.

या पिकाला मोठ्या प्रमाणात खर्चाने उभे केले जाते. त्यातून आतापर्यंत अनेक नैसर्गिक संकटाला सामोरे जावून पिक सांभाळले. नुकतेच माल चालू होत असताना निसर्गाचा लहरीपणा हा दिवसेंदिवस तसाच राहिल्याने मोठया प्रमाणात पिक करपू लागले आहे.

त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास आता निसर्ग हिरावून घेतो की काय अशी धास्ती आता टोमॅटो उत्पादक शेतकरी करू लागला आहे. त्यातच विक्रीसाठी आणलेला मालसुद्धा अचानक आलेल्या पावसामुळे विक्री करणे अवघड होत आहे.

Related Stories

No stories found.