येवला तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

येवला तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

येवला | प्रतिनिधी Yeola

आज दुपारी येवला तालुक्यात ( Yeola Taluka ) राजापूर, ममदापूर ( Rajapur, Mamdapur )परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने ( Rain )जोरदार हजेरी लावली. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

ममदापुर येथील गोपीनाथ वैद्य यांच्या राहत्या घराचे छत उडाल्याने त्यांचे संसार उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राजापुर गावाजवळ गोपाळ वाडा येथे झाड कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. सदर नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मच्छिन्द् साबळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com