दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस
नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस

Abhay Puntambekar

ओझे । वार्ताहर Dindori / Oze

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात शेतीसह नागली, वरई पिकाना मध्येच पाऊसाने दडी मारल्यामुळे मोठा फटका बसला होता मात्र गेल्या चार दिवसापासून दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागा मध्ये चांगला भीज पाऊस पडत असल्यामुळे खोळंबलेली भात आवणी अंतिम टप्यात आली असून भात उत्पादक शेतक-याच्या मुखी हसु फुलले आहे .

चालू वर्षी या भागातील भात शेती फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे करण गेली दोन महिने या परिसरामध्ये भात शेती योग्य पाऊस पडला नाही परिणामी भात आवणीला उशिर झाला यामुळे झालेली भात अवणी ,वाढलेले भातचे रोपे कितपत वाढ घेतात तसेच भातासाठी लागणारे हवामान यांचा विचार केल्यास इकडे ’आड तिकडे विहिर ’ आशी अवस्था सध्या तरी भात उत्पादक शेतकरी वर्गाची दिसून येत आहे त्याप्रमाणे नागली वरई या पिकाना या वर्षी मोठा फटका बसणार असल्याचे या परिसरातील शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे .

या परिसरातील मुख्य पिक म्हणून भात नागली वरई या पिकाकडे पाहिजे जाते येथील शेतकरी वर्गाची वार्षिक अर्थिक उलाढाल यांच पिकांवर असते तसेच पाहिले तर दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये कायम जोरदार पाऊस पडत असतो चालू वर्षी या परिसरामध्ये उशिरा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाला उत्पन्नाच्या बाबतीत फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसा पासून पडण्या भिज पाऊसाने जमिनीची शांतता झाली असून शेतातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली असून ओहळ, नाले खळखळू लागले आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी असलेले छोटे मोठया तलावात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे दिंडारीच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडतो तेव्हाच तालुक्यातील धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात होत असते गेल्या तीन दिवसा पासून पडण्या पाऊसामूळे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या व येवला मनमाड तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासह शेती वरदान असलेल्या करंजवण धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली असून १७% वरून पाणीसाठा ३०% वर गेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com