भात आवणी
भात आवणी
नाशिक

दिंडोरीसह त्र्यंबक, इगतपुरी तालुक्यात जोरदार पाउस

शेतकऱ्यांच्या जीवात जीव : भात आवणी अंतिम टप्प्यात

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझे | Oze

गेल्या चार दिवसापासून दिंडोरीसह त्र्यंबक, इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे खोळंबलेली भात आवणी अंतिम टप्यात आली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याच्या मुखी हसु फुलले आहे.

दरम्यान पाऊस पडत असला तरी यंदा दिंडोरी सह त्र्यंबक, इगतपुरी परिसरातील भात शेतीला फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

भात लागवडी नंतर पावसाने उघडीप दिल्याने भात पिके मरणासन्न अवस्थेत होती. परंतु गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे यातील ५० टक्के भात शेती तरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दरवर्षी दिंडोरी, त्र्यंबक, इगतपुरी पट्ट्यात मुसळधार पाऊस होत असतो. परंतु यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे. गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या व येवला मनमाड तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासह शेती वरदान असलेल्या करंजवण ३० टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com