त्र्यंबक परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
त्र्यंबक परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार

नाशिक । Nashik

गेल्या पंधरा वीस दिवसापासूनच गायब असलेला कालपासून त्र्यंबक परिसरात (Trimbak Area) जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा (Consolation to the farmers) मिळाला असून शेती कामांना (Farming Work) जोमाने सुरवात झाली आहे.

दरम्यान खरीप हंगामासाठी (Kharip Seasoon) पेरणी केल्यानंतर पावसाने खो दिला होता. त्यामुळे भात पिक उपटून टाकायची वेळ शेतकऱ्यावर आली होती. तर अनेक ठिकाणी दुबार पेरणी (Double Sowing) देखील केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु काल दुपारपासून पावसाची संततधार सुरूच असून यामुळे भात पिकासह (Rice Cultivation) इतर पिकांना दिलासा मिळणार आहे.

त्र्यंबक तालुक्यात (Trimabk Taluka) भातशेतीचे प्रमाण अधिक असते. भात लावणीसह टोमटो, नागली, वरई आदी पिकाची लागवड करण्यास सरुवात केली जाते. सध्या मजुरांअभावी ही सर्व कामे घरातील कुटुंबीयांचे सदस्य आपल्या परीने करीत होते. या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना वरुणराजा रुसून बसला होता.

पावसाच्या कृपावृष्टीसाठी शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता. वरुणराजाला साकडे घालत होता. कारण शेती व्यवसायाची कामे वेळेवर करूनही पिके हातची जाण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत होते. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला होता.

अशी अवस्था असताना वरुणराजा समाधानकारक बरसल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com